तू
लिहितेस मनातलं..
तू
गातेस गळ्यातलं..
तू
वाचतेस डोळ्यातलं ..
तू
रचतेस अद्भुतसे
तू
बनवतेस अक्रितसे
तू
रंगवतेस अगम्यसे
तू
राहतेस हृदयआत..
तू
वाहतेस नसांत ..
तू
भिनतेस रक्तात ..
तू
वागतेस स्वच्छंद..
तू
फिरतेस मुक्त ..
तू
जगतेस विरक्त ..
तू
पेलवत नाही विचारात ..
तू
पुरत नाही शब्दात..
तू
उतरत नाही कवितेत ...
Tags:
Share
Facebook
You need to be a member of Marathi Adda to add comments!
Join Marathi Adda